१. जमीन
तुर पिकास चोपन व क्षारयुक्त जमीन मानवत नाही. टोकण पद्धतीने लागवड करावी. टोकण पद्धतीने २:५ किलो प्रति एकरी जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ या पिकाच्या वाढीस योग्य असतो. आम्लयुक्त बियाणे पुरेसे होते. जमिनीत पिकांच्या मुळावरील गाठींची योग्य वाढ होत नसल्याने रोपे पिवळी पडतात.
२. पूर्वमशागत

तुरीची मुळे खोलवर जात असल्यामुळे जमीन खोल नांगरून वखराच्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. उत्तम प्रकारच्या मशागतीमुळे मुळांची वाढ चांगली होते. शेवटच्या वखराच्या पाळीच्या अगोदर एकरी १५ ते २० गाड्या कुजलेले कंपोस्ट खत अथवा शेणखत जमिनीत चांगले मिसळावे .

३.सुधारीत वाणांची निवड

अधिक उत्पादनासाठी कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेल्या सुधारित वाणांची
निवड करावी मुख्यत्वेकरून मर व वांझ रोगास प्रतिकारक्षम वाणांची निवड
करावी. जसे की बीडीएन-७११ (पांढरी तुर), बीडीएन २०१३-४१(पांढरी
तुर), बीएसएमआर ८५३ (पांढरी तुर). लागवडीसाठी अयोग्य वाण –
आयसीपीएल ८८६३ हा वाण मारुती या नावाने प्रचलित आहे. हा वाण मर
रोगास मोठया प्रमाणात बळी पडतो म्हणून हा वाण लागवडीस योग्य नाही.

बी.डी.एन.-७११
बी.एस.एम.आर.-८५३
४. बीज प्रक्रिया
रायझोबियम व पीएसबी या जिवाणूसंवर्धकाची तसेच मर रोग होऊ नये म्हणून ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.जिवाणू संवर्धकाच्या वापर केल्यास (एकरी खर्च १८०/- रु. फक्त) उत्पादनात सरासरी १० ते १५ टक्के वाढ होते.
५.पेरणीची वेळ
मान्सूनचा समाधानकारक (७५ ते १०० मि.मि.) पाऊस पडल्यानंतर वापसा येताच तुरीची पेरणी करावी. कोणत्याही परिस्थितीत १५ जून ते १५ जुलैपर्य॑त पेरणी करावी.
६.लागवडीचे अंतर
जिरायती लागवडीसाठी दोन ओळीतील अंतर ३ फूट व दोन रोपांतील अंतर १ फूट ते १:२५ फूट एवढे ठेवावे. एकरी ५ ते ६ किलो बियाणे पुरेसे होते. बागायती लागवडीकरिता एका ठिकाणी दोन-तीन बिया टाकून ३ बाय ३ फूट टोकण पद्धतीने लागवड करावी. टोकण पद्धतीने २:५ किलो प्रति एकरी बियाणे पुरेसे होते.
७. आंतरपीक

अधिक उत्पादनासाठी तसेच जमिनीची उत्पादकता राखण्यासाठी सोयाबीन+ तूर आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास अधिक फायदा होतो .

८. रासायनिक खते

२५ किलो स्फुरद व ५० कि नत्र (NPK: २५:५०:००) तुरीची जोरदार वाढ होण्यासाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी २५ किलो युरिया आणि १२/३२/१६ दोन बॅग जमिनीतून द्यावे. जमिनीत पालाशची कमतरता असल्यास हेक्टरी ३० किलो पालाश द्यावे. तसेच हेक्टरी २० ते २५ किलो गंधक जिप्सम मधून
वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे. (सिंगल सुपर फॉस्फेट खत
वापरल्यास वेगळा गंधक देण्याची आवश्यकता नाही). जमिनीत जस्ताची
कमतरता असल्यास पेरणीपूर्वी प्रति हेक्टरी १५ किलो झिंक सल्फेट
वापरल्यास उत्पादनात २५ टक्के पर्यत वाढ होते. कोरडवाह तुर पिकामध्ये दोन टक्के युरिया पीक फुलावर येत असताना आंतरपीक काढल्यानंतर १५ दिवसांच्या आत फवारणी केल्यास फायदा होतो.

९. आंतर मशागत

पीक २० ते २५ दिवसांचे असताना पहिली आणि त्यानंतर ३० ते ३५ दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी तुरीचे पीक पेरणीपासून ४५ दिवसांपर्यत तणविरहित ठेवल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होते. यानंतर आंतर मशागत केल्यास मुळ्या तुटण्याचा धोका असतो व मर रोग येण्याची शक्यता असते.

१०. संजीवकांचा वापर

शाखीय वाढ रोखण्यासाठी पेरणीनंतर ९० दिवसांनी सायकोसिल ८० पीपीएम (८० मिली लिहोसीन) ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. फुलगाठ होऊ नये म्हणून १५ ते २० पीपीएम एनएएची ४ ते ५ मिली
प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

११. पाणी व्यवस्थापन

पिकास सुरुवातीच्या काळात १५ ते २० दिवस आणि शेंगा तयार होण्याच्या काळात २५ ते ३० दिवस पाण्याचा ताण पडल्यास पाणी देणे आवश्यक आहे.
१. कळ्या धरताना २. फुलोऱ्यात ३. शेंगात दाणे भरताना या अवस्थेत जमिनीत ओलावा नसल्यास पाण्याच्या पाळ्या देणे आवश्यक आहे.

१२. एकात्मिक कीड व्यवस्थापन
 • घाटे अळीचे कोष नष्ट करण्यासाठी उन्हाव्व्यात जमिनीची खोल नांगरट करावी.
 • शिफारस केलेल्या वाणांची योग्य अंतरावर पेरणी करावी
 • ज्यावेळी तुरीची पेरणी केली जाते त्यावेळेस बियाण्यात एक टक्का ज्वारी अथवा बाजरीची बी मिसळून पेरणी करावी. तुरी बरोबर ज्वारी बाजरी मका अथवा सोयाबीन ही आंतरपिके घ्यावी.
 • वेळेवर आंतरमशागत करून पीक तणविरहित ठेवावे
 • पाने गुंडाळणाऱ्या अळीची प्रादुर्भावग्रस्त पाने गोळा करून अळीसहित नष्ट करावीत.
 • शेताच्या बांधावरील तुरीच्या शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या पर्यायी खाद्य तणे उदा. कोळशी, रानभेंडी, पेटारी ही तणे वेळोवेळी काढून नष्ट करावीत.
 • पूर्ण वाढ झालेल्या अळ्या वेचून नष्ट कराव्यात.
 • पक्ष्यांना बसण्यासाठी हेक्टरी ५० ते ६० पक्षी थांबे शेतात लावावे जेणेकरून त्यावर पक्षी बसून शेतातील अळ्या वेचून खातील.
 • शेंगा पोखरणाऱ्या हिरव्या अळी साठी पीक कळी अवस्थेत आल्यापासून
  हेक्टरी पाच कामगंध सापळे लावावेत जेणेकरून किडीची आर्थिक नुकसानीची पातळी समजेल.
 • तुरीच्या झाडाखाली पोते टाकून झाड हलवावे आणि पोत्यावर पडलेल्या
  अळ्या वेळोवेळी गोळा करून नष्ट कराव्यात,
 • पिकास फुलकळी येऊ लागताच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५ टक्के
  निंबोळी अर्क अधिक १ टक्का साबणाचा चुरा याची फवारणी करावी.
 • शेंगा पोखरणारी हिरवी अळी लहान अवस्थेत असताना एच ए एन पी व्ही
  विषाणूची २५० एल ई प्रति हेक्टर प्रमाणे फवारणी सायंकाळी करावी.
 • आर्थिक नुकसानीच्या पातळीनुसार खालील प्रमाणे रासायनिक कीटकनाशकाची आलटून पालटून फवारणी करावी.
आर्थिक नुकसानीची पातळी

घाटेअळी: कामगंध सापव्व्यात सलग दोन ते तीन दिवस आठ ते दहा पतंग प्रति सापळा .

घाटेअळी : प्रत्येक मीटर ओळीवर फुलोऱ्याच्या वेळी किंवा फुलोऱ्यानंतर
कधीही २ अळ्या किंवा ५ टक्के शेंगांचे नुकसान.

पाने गुंडाळणारी अळी व पिसारी पतंग : ५ अव्व्या प्रति १० झाडे.

शेंग माशी : ५ टक्के हिरव्या प्रादुर्भावग्रस्त शेंगा.

रासायनिक कीटकनाशके
 • क्विनालफॉस – २५ टक्के किंवा २८ मिली
 • इमामेक्टीन बेंझोएट – ५ टक्के किंवा ४.५ ग्रॅम
 • फ्लुबेंडामाईड – ३९.३५ टक्के किंवा २ मिली
 • लॅम्बडा सायहॅलोथ्रीन – ५ टक्के किंवा १० मिली
 • क्लोरेंट्रानिलीप्रोल-  १८.५ टक्के
१३. रोग व्यवस्थापन

तूर पिकावर प्रामुख्याने आढळून येणारे महत्वाचे रोग म्हणजे मर आणि वांझ रोग
होय. या रोगाच्या व्यवस्थापनासाठी पिकांची फेरपालट, रोगप्रतिकारक जातींचा
वापर , पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास २ ते २.५ ग्रेंम थायरम किंवा कार्बेन्डाझिम या बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी आणि रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.

१४. काढणी, मळणी व साठवण

शेंगा पक्क झाल्यानंतर तुरीचे पीक कापून खळ्यावर २ ते ३ दिवस
वाळवावे त्यानंतर काठीने झोडपून पुढचा व दाणे अलग करावेत त्यानंतर २ ते ३ दिवस पुन्हा धान्य चांगले वाळवावे व नंतरच साठवणूक करावी

प्रयोगशील शेतकरी दिपक बुनगे, जालना
प्रती एकरी १७ क्विं. उत्पादन तंत्रज्ञान
मो. ८८४७७४०२२९

शेंडा खडणी : .

 • पेरणीनंतर २५ दिवसाला
 • पेरणीनंतर ५५ दिवसाला
 • पेरणीनंतर ७५ ते ८० दिवसाला
 • शेंडा खुडणी करावी यामुळे उत्पादनात भर पडेल

लागवडीमधील अंतर जोड वळ पद्धत :

लागवडीतील अंतर चार चार फुटावर रोगुट्या मारायच्या पहिल्या ४ फुटावर व दुसऱ्या ४ फुटावर लावगड करायची व तिसऱ्या ओळ न लावता सोडायची याला जोड वळ पध्दत असे म्हणतात व दोन रोपातील अंतर दीड फुट ठेवायच.

 • ताक व अंड्याचा प्रयोग
 • १ लिटर ताक १५ ते २० अंडी फोडून टाकावे.
 • ३ दिवस बंद झाकन करूण ठेवावे व सकाळ संध्याकाळ झाकन. काडून काडीने हालवावे त्या डब्यावर हिरवी माशी बसनार नाही याची काळजी घ्यावी.
 • तिसऱ्या दिवसी संध्याकाळी १०० ग्राम गुळ बारीक करून टाकावे. ४ दिवस झाल्यावर फवारणी साठी तयार होते
 • या द्रावनाची फवारणी कळी अवस्थेत व फुल अवस्थेत फवारणी केल्यास आधिक फायदा होतो.
 • फवारणीचे प्रती १ लिटर पाण्याला १० मिली ने फवारणी करावी.
 • वरील प्रयोग दिपक बनगे यांनी केला असता त्यांच्या उत्पादनामध्ये २० २५% भर पडली आहे.

टिप : वरील द्रावन कुठल्या ही बुरशीनाशका सोबत फवारणी करू नये (उपरोक्त प्रयोग शेतकऱ्यांनी आपल्या जबाबदारीवर करावेत).

संपर्क क्रमांक

 • क्रमांक गोदा फार्मर्स जनसंपर्क अधिकारी : ७४४७७५८३०९
 • प्रत्यक्ष पीक सल्ला आणि कृषि निविष्ठा विक्री विभाग : ७४४७७५८३०३
रोजच्या खरेदी भावासाठी
×